भीमाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न....!! ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण.

0

** भीमा' साखर कारखाना सज्ज! गळीत हंगामासाठी बॉयलर प्रज्वलित. ** भीमा' ची मोहिम धडाक्यात! बॉयलर प्रदीपनाने हंगाम शुभारंभाची नांदी; ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण.

मोहोळ - भीमा सहकारी साखर कारखाना लि;टाकळी सिकंदर ता- मोहोळ जि- सोलापूर या संस्थेचा सन 2025-26 या गळीत हंगामाचा "46 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ" संस्थेचे "मार्गदर्शक संचालक तथा राज्यसभा खासदार मा.श्री.धनंजय भिमराव महाडिक साहेब" व संस्थेचे "चेअरमन मा.श्री.विश्वराज धनंजय महाडिक साहेब" यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 12.10.2025 रोजी कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला.  


    सदर मंगल प्रसंगी संस्थेचे "संस्थापक अध्यक्ष कै.पै.भिमराव दादा महाडिक" यांच्या फोटोचे पुजन व दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करणेत आली. "सत्यनारायण महापूजा" सकाळी ठीक 07.00 वाजता संस्थेच्या विद्यमान संचालिक मा.सौ.सिंधू चंद्रसेन जाधव व मा.श्री.चंद्रसेन मुरलीधर जाधव या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली. 

        तसेच "बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ" सकाळी ठीक 09.00 वाजता संस्थेचे विद्यमान संचालक मा.श्री. तात्यासो ज्ञानोबा नागटिळक व मा. सौ. सुजाता तात्यासो नागटिळक या उभयतांचे व उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न झाला. सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक मा.श्री. सुनील दादा चव्हाण यांनी सन 2025-26 चा 46 वा गळीत हंगाम सुरू करणेकरिता कारखान्याची आवश्यक ती सर्व कामे पुर्णत्वास आलेली असून तोडणी व वहातुक यंत्रणा सज्ज झालेले आहे. अशी माहिती त्यांनी भाषणावेळी दिली.

 सदर प्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक खालीद शेख,विद्यमान संचालक श्री. बिभीषन वाघ, सिद्राम मदने, अनिल गवळी, राजेंद्र टेकळे, सुनिल चव्हाण, संभाजी कोकाटे, संतोष सावंत, बाळासाहेब गवळी तसेच उत्तम मुळे,झाकीर मुलाणी, राजाराम बाबर,भारत पाटील,किसन जाधव, छगन पवार,पापा चव्हाण, सभासद, शेतकरी,पत्रकार, कार्यकर्ते,अधिकारी, व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)